Episodes

  • # 1974 : जगी सर्वसुखी असा कोण आहे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Feb 24 2026

    Send a text

    एक दिवस जंगलातल्या तळ्याकाठी बसला असताना त्याला त्या तळ्यात पोहोत असलेला राजहंस दिसला. तो पांढराशुभ्र आणि डौलदार पक्षी पाहून तो थोडा हिरमुसला आणि विचार करू लागला," मी असा काळा कुळकुळीत एकदम आणि हा पक्षी एकदम शुभ्र, खरच हाच जगातला सर्वात सुखी पक्षी असावा, मी उगाचंच मला सुखी समजत होतो " असा विचार करत तो त्या राजहंसाकडे गेला आणि त्याला आपल्या या भावना बोलून दाखवल्या. तो राजहंसही म्हणाला," खरं आहे मित्रा तुझं, मी ही समजत होतो असं, पण एके दिवशी मी एका पोपटाला पाहिलं , मला एक रंग आहे पण त्याला दोन रंग होते, खरच तो माझ्यापेक्षा सुखी असणार रे "

    Show More Show Less
    5 mins
  • # 1973 : गुप्तदान. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Feb 23 2026

    Send a text

    शाळेला १० संगणक भेट देण्यासाठी मुंबईचे मोठे बिझनेसमन 'मिस्टर सुहास ओक' आले होते. सुहासरावांचा थाटच वेगळा होता. पांढरी शुभ्र मर्सिडीज, अंगावर महागडा सफारी सूट आणि डोळ्यावर रे-बॅनचा गॉगल. त्यांच्यासोबत चार बाउन्सर आणि दोन फोटोग्राफर होते. त्यांचा नियमच होता - "दहा रुपयांचं दान करायचं, तर शंभर रुपयांचा गाजावाजा झाला पाहिजे".

    Show More Show Less
    7 mins
  • # 1972 : नेत्रदाता शिवभक्त कन्नप्पा नयनार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Feb 22 2026

    Send a text

    एके दिवशी शिव शंभूंनी भक्त कन्नप्पांची परीक्षा घेण्याचा विचार केला आणि मंदिरात कंपनं निर्माण करून मंदिराचे छत पाडले, हे दृश्य बघून सगळे लोकं मंदिरातून पळून गेले पण कन्नप्पा यांनी शिवलिंग वाचवण्यासाठी आपल्या शरीराने शिवलिंगाला झाकून घेतलं, नंतर त्यांना शिव शंभूच्या डोळ्यांतील सांडत असलेलं रक्त दिसलं, हे बघून कन्नप्पा यांनी पटकन बाणाच्या सहाय्याने स्वतःचा एक डोळा काढला आणि शिव शंभूला लावून दिला.

    Show More Show Less
    4 mins
  • 1970 : "इंटरनॅशनल स्कूल आणि राम राम" ( प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. )
    Feb 20 2026

    Send a text

    “आई, मी तुला हजार वेळा सांगितलं आहे… चिंटूच्या समोर तुझी ती गावाकडची भाषा बोलू नकोस!”

    सागरचा आवाज थोडा चिडलेला होता.

    “उद्या त्याचा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंटरव्ह्यू आहे. तिथे जाऊन त्याने

    ‘कसा हाईस माज्या राजा' ‘बरा हाय न्हवं’, किंवा ‘राम-राम ’ म्हटलं ना… तर माझं नाक कापलं जाईल! तिथे डोनेशन देऊनही अॅडमिशन मिळत नाही. ... स्टेटस बघतात… क्लास बघतात!”

    Show More Show Less
    7 mins
  • # 1969: पोर्थोल मधून फेकलं म्हणून ती वाचली. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Feb 17 2026

    Send a text

    अँटोनियोने मारियाकडे पाहिलं.
    एवढीशी.. लहान…
    इतकी घाबरलेली…
    आईला हाक मारणारी
    आणि मग…
    त्याने तेच केलं, जो आता त्याच्या पुढचा एकमेव मार्ग होता.
    त्याने आपल्या लेकीला पोर्थोलमधून बाहेर ढकललं.
    मारिया काळ्या पाण्यात पडताच किंचाळली.
    अँटोनियोने उरलेल्या ताकदीने ओरडून सांगितलं —
    “पोहत रहा मारिया! रोषणाईकडे पोहत जा! जहाजं येत आहेत — पोहत रहा!”

    Show More Show Less
    6 mins
  • # 1968: क्रांतीकारक बटुकेश्वर दत्त. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Feb 15 2026

    Send a text

    १९६४ मध्ये ते आजारी पडले तेव्हा त्यांना सरकारी दवाखान्यात भरती केले गेले, त्यांची अवस्था पाहून त्यांचे मित्र चमनलाल आजाद यांनी लिहिले होते

    "बटुकेश्वर दत्तासारख्या क्रांतिकारकांनी भारतात जन्म घ्यावा का? परमेश्वराने त्यांना या देशात जन्माला घालुन फार मोठी चुक केली आहे. ज्या व्यक्तीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावली तो दवाखान्यात तळमळत आहे, विचारणारासुध्दा कोणी नाही"??

    Show More Show Less
    6 mins
  • # 1966: ह्रदयपरीवर्तनी महाशिवरात्रीची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Feb 14 2026

    Send a text

    मनुष्याप्रमाणे प्राण्यांना जगायला स्वत:साठी अन्न पिकवता येत नाही. त्यातूनच 'जीवो जीवस्य जीवनम्' हा सृष्टीनियम झाला. पण प्रत्येकाला कुटुंब प्रेम.. समाज.. देश प्रेम आहेच. अगदी प्राण्यामध्येही कुटुंब प्रेम आहेच.
    एकदा एका उपाशी पारध्याच्या हाती हरिणी सावज आले. "मला एकदा कर्तव्यपालनासाठी घरी जावू द्या, माझी लेकरं माझी घरी वट पहात असतील. त्यांना एकवार शेवटचे जवळ घेऊ द्या" अशी हरिणीने विनंती करून परत येण्याचे वचन पारध्यास दिले.

    Show More Show Less
    8 mins
  • "आणि हे जग एक समीकरण आहे". ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Feb 13 2026

    Send a text

    समीरची नजर त्या म्हाताऱ्यावर पडली. गाडी सिग्नलला थांबली होती. समीरने खिडकीतून बाहेर पाहिलं. त्या म्हाताऱ्याने भिंतीवर जे लिहिलं होतं, ते बघून समीरचे डोळे विस्फारले. ते काही गिचमिड नव्हतं. ती 'कॅल्क्युलसची अवघड समीकरणं' होती, आणि ती इतकी अचूक होती की, एखाद्या सामान्य प्रोफेसरलाही सोडवायला वेळ लागेल.

    Show More Show Less
    7 mins