• तेलभूमीत नेमकं काय घडतं?
    Mar 21 2026

    इराण आणि अमेरिका-इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु झाले आणि त्याच्या ज्वाला संपूर्ण आखाती देशांत धगधगत आहेत. हॉर्म्युझची सामुद्रधुनीत तणाव निर्माण झाल्याने जगभरातील तेल व गॅसच्या वितरणावर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आखाती देशांमध्ये असणाऱ्या तेलविहिरी, तेथील तेल काढण्याची प्रक्रिया, त्यातील तंत्रज्ञान अशा अनेक बाबींचे कुतुहल सर्वांना आहे. अस्सल पुणेकर असणारे शौनक गाडगीळ हे पेट्रोकेमिकल तंत्रज्ञ गेली अनेक वर्षे प्रत्यक्ष तेलविहिरींवर काम करतात. त्यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या या संवादातून सर्वसामान्य जनांना आजवर अज्ञात अशा अनेक गोष्टी सहजपणे उलगडतात. जगाच्या भवितव्याची दिशा ठरवण्याची शक्ती असणाऱ्या तेलाच्या अर्थव्यवस्थेशी निगडित ही माहिती आपणा सर्वांच्या ज्ञानात मोठी भर घालणारी ठरते.

    Show More Show Less
    27 mins
  • हेरगिरी... पुस्तकांत रंजक पण प्रत्यक्षात?
    Mar 13 2026

    आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशाचे हेर कार्यरत असतात. त्यांच्या थरारक कथा चित्रपट, वेबसिरीज किंवा पुस्तकांच्या माध्यामातून आपल्यापर्यंत पोहोचतात, खिळवून ठेवतात. प्रत्यक्षात हेरगिरी अशीच होत असते का? त्यातून युद्धाचे डाव खेळले जातात का? असे प्रश्न मग सर्वसामान्य रसिकांना पडतात. अशीच एक थरारक हेरकथा storytel वर दाखल झाली आहे- समीर चक्रवर्ती ऑपरेशन बलुचिस्तान! तिचे लेखक आहेत प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी, ज्यांनी स्वतः खासगी गुप्तहेर म्हणून काम केले आहे. सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर खुद्द संजय सोनवणी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या या संवादातून अनेक रंजक गोष्टी तर उलगडतात शिवाय इराण आणि अमेरिकेतील संघर्ष, त्याची मूळे यावरही प्रकाश पडतो!

    Show More Show Less
    25 mins
  • ऑडिओबुक्स आता मुख्य प्रवाहात...
    Feb 12 2026

    वाचनाचे प्रमाण कमी होते आहे, ही परिस्थिती आपल्याकडेच नव्हे तर जगभरात आहे. जगात नवी पिढी ऑडिओबुक्सकडे का वळते आहे? भारतात काय परिस्थिती आहे? 2026 मध्ये वाचनसंस्कृतीत काय बदल पाहायला मिळू शकतात? ऑडिओ पब्लिशिंग इंडस्ट्री याकडे कसे पाहते आहे याचा वेध घेण्यासाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, स्टोरीसाइड इंडिया या पब्लिशिंग आणि स्टोरीटेल इंडियाचे भारताचे प्रमुख योगेश दशरथ यांना. यातून खूप रंजक अशी उलगड होते आहे आणि येणाऱ्या काळात वाचनसंस्कृती कशी बदलणार आहे, याचा अंदाजही होतो. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने ऐकायलाच हवा, असा हा संवाद.

    Show More Show Less
    19 mins
  • डायट प्लॅन करताना...
    Feb 5 2026

    चांगल्या आरोग्यासाठी चांगला आहार आवश्यकच. मात्र प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याचा डायट प्लॅन असायला हवा, असे आहारशास्त्र सांगते. मग, फास्ट फूडची सवय असणाऱ्यांनी काय करावे, आयुर्वेदिक मार्गाने जावे की आधुनिक असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात डोकावतात. त्यातही ज्यांना काही आजार असेल त्यांच्यासाठी क्लिनिकल न्यूट्रिशन्स कसे मदत करते, त्यांच्यासाठी डायट प्लॅन करताना काय केलं जातं अशा अनेक बाबींची उलगड क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट निशा गोडबोले-पुजारी यांनी केली आहे, संतोष देशपांडे यांसमवेतच्या या खास आरोग्य संवादातून.

    Show More Show Less
    30 mins
  • अर्जुनाविषयी का लिहावसे वाटले?
    Jan 27 2026

    साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार लाभलेले लेखक प्रणव सखदेव यांची नवी साहित्यकृती- वीर योद्धा अर्जुन, नुकतीच पुणे पुस्तक महोत्सवातून रसिकांपुढे आली. त्याविषयी प्रणव सखदेव यांच्याशी साधलेला हा छोटेखानी संवाद.

    Show More Show Less
    3 mins
  • `पूर्णवादा`ची जागतिक दखल
    Jan 16 2026

    महाराष्ट्राच्या पावन भूमीत डॉ. पारनेरकर महाराजांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पूर्णवाद तत्त्वज्ञानाची ओळख आता जगभरात होते आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था 'हार्पर काॅलिन्स' प्रकाशित Know Thy Roots सारख्या ग्रंथाच्या माध्यमातून नांदेड येथील डॉ. टी.पी. देशपांडे सरांनी पूर्णवाद आंतरराष्ट्रीय पटलावर आणला. नुकत्याच झालेल्या भारतीय तत्त्वज्ञान परिषदेत त्यावर विशेष व्याख्यान दिले. या पार्श्‍वभूमीवर, पूर्णवाद म्हणजे नेमके काय, त्याचे महत्व काय, Know Thy Roots मध्ये काय आहे याविषयी डॉ.टी.पी. देशपांडे यांच्याशी साधलेला हा संवाद भारतीय तत्त्वज्ञानामध्ये रुची असणार्‍या प्रत्येकाने ऐकायलाच हवा!

    Show More Show Less
    22 mins
  • 'स्पेलिंग' बदलून नशीब बदलते?
    Dec 22 2025

    Numerology म्हणजेच अंकशास्त्र याचा आपल्या नावाच्या 'स्पेलिंग'शी काय संबंध आहे? आपल्या नावाचे स्पेलिंग बदलून आपले भवितव्य बदलता येते का? असेल तर कसे? या विषयी पुण्यातील प्रसिद्ध Numerology अभ्यासक नीलेश पैठणकर यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा एकदम 'हटके' संवाद!

    हा संवाद युट्यूबवर पाहण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा- https://youtu.be/Ldek3dxkhDE

    Show More Show Less
    29 mins
  • उद्याची 'फॉरेन लँग्वेज' कोणती?
    Dec 15 2025

    परकीय भाषा शिकणे केव्हाही उपयुक्त असते, असे आपण ऐकतो. मात्र, आजच्या परिस्थितीत नेमक्या कोणत्या परकीय भाषा शिकायला हव्यात, कोणत्या भाषांना चांगले भवितव्य आहे याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. परकीय भाषातज्ज्ञ अदिती विशाल यांच्याशी याच विषयावर संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यातून परकीय भाषा का शिवावी इथपासून कोणती भाषा शिकणे सोपे आहे, कठीण आहे आणि कोणत्या भाषांना नजिकच्या काळात भवितव्य आहे इथपर्यंत अनेक बाबींची सहज आणि सोप्या शब्दांत उलगड होते. परकीय भाषांविषयी कुतुहल असलेल्या प्रत्येकाने ऐकायलाच हवा, असा हा स्टोरीटेल कट्टा स्पेशल पॉडकास्ट.

    हा एपिसोड युट्यूबवर पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://youtu.be/wSEJ1-oXlx8

    Show More Show Less
    25 mins