स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum cover art

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

By: Santosh Deshpande
Listen for free

About this listen

A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.Mediacura Infoline Art Literary History & Criticism
Episodes
  • तेलभूमीत नेमकं काय घडतं?
    Mar 21 2026

    इराण आणि अमेरिका-इस्त्रायलमध्ये युद्ध सुरु झाले आणि त्याच्या ज्वाला संपूर्ण आखाती देशांत धगधगत आहेत. हॉर्म्युझची सामुद्रधुनीत तणाव निर्माण झाल्याने जगभरातील तेल व गॅसच्या वितरणावर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आखाती देशांमध्ये असणाऱ्या तेलविहिरी, तेथील तेल काढण्याची प्रक्रिया, त्यातील तंत्रज्ञान अशा अनेक बाबींचे कुतुहल सर्वांना आहे. अस्सल पुणेकर असणारे शौनक गाडगीळ हे पेट्रोकेमिकल तंत्रज्ञ गेली अनेक वर्षे प्रत्यक्ष तेलविहिरींवर काम करतात. त्यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या या संवादातून सर्वसामान्य जनांना आजवर अज्ञात अशा अनेक गोष्टी सहजपणे उलगडतात. जगाच्या भवितव्याची दिशा ठरवण्याची शक्ती असणाऱ्या तेलाच्या अर्थव्यवस्थेशी निगडित ही माहिती आपणा सर्वांच्या ज्ञानात मोठी भर घालणारी ठरते.

    Show More Show Less
    27 mins
  • हेरगिरी... पुस्तकांत रंजक पण प्रत्यक्षात?
    Mar 13 2026

    आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशाचे हेर कार्यरत असतात. त्यांच्या थरारक कथा चित्रपट, वेबसिरीज किंवा पुस्तकांच्या माध्यामातून आपल्यापर्यंत पोहोचतात, खिळवून ठेवतात. प्रत्यक्षात हेरगिरी अशीच होत असते का? त्यातून युद्धाचे डाव खेळले जातात का? असे प्रश्न मग सर्वसामान्य रसिकांना पडतात. अशीच एक थरारक हेरकथा storytel वर दाखल झाली आहे- समीर चक्रवर्ती ऑपरेशन बलुचिस्तान! तिचे लेखक आहेत प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी, ज्यांनी स्वतः खासगी गुप्तहेर म्हणून काम केले आहे. सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर खुद्द संजय सोनवणी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेल्या या संवादातून अनेक रंजक गोष्टी तर उलगडतात शिवाय इराण आणि अमेरिकेतील संघर्ष, त्याची मूळे यावरही प्रकाश पडतो!

    Show More Show Less
    25 mins
  • ऑडिओबुक्स आता मुख्य प्रवाहात...
    Feb 12 2026

    वाचनाचे प्रमाण कमी होते आहे, ही परिस्थिती आपल्याकडेच नव्हे तर जगभरात आहे. जगात नवी पिढी ऑडिओबुक्सकडे का वळते आहे? भारतात काय परिस्थिती आहे? 2026 मध्ये वाचनसंस्कृतीत काय बदल पाहायला मिळू शकतात? ऑडिओ पब्लिशिंग इंडस्ट्री याकडे कसे पाहते आहे याचा वेध घेण्यासाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, स्टोरीसाइड इंडिया या पब्लिशिंग आणि स्टोरीटेल इंडियाचे भारताचे प्रमुख योगेश दशरथ यांना. यातून खूप रंजक अशी उलगड होते आहे आणि येणाऱ्या काळात वाचनसंस्कृती कशी बदलणार आहे, याचा अंदाजही होतो. पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने ऐकायलाच हवा, असा हा संवाद.

    Show More Show Less
    19 mins
No reviews yet
In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.